Top News

चुकीच्या नियोजनामुळे नालीतील सांडपाणी थेट रस्त्यावर #gadchandur #chandrapur #korpana


नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास जबाबदार कोण?


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- तालुक्यातील गडचांदूर नगर परिषद होऊन सात-आठ वर्षे लोटून गेले, मात्र गडचांदूर शहराची परस्थिती "जैसे थे" च आहे. गडचांदूर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये भंडारा कॉलनी रोड च्या दोन्ही बाजूला सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. या नालीमधून सांडपाणी वाहून जाणे गरजेचे आहे. मात्र चुकीच्या नियोजनामुळे रस्त्यावर सांडपाणी जमा असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रभागातील नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


नगर परिषद असलेल्या गडचांदुर शहरात प्रभाग क्रमांक ७ भंडारा कॉलनी मध्ये विदारक चित्र बघायला मिळत आहे. नगरसेवक, नगर परिषद आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तातडीने या सदर बाबी कडे लक्ष देऊन रस्त्यावर जमा झालेले सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. लोकप्रतनिधीं या कडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल. प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी कुणाची नगरसेवक की नगर परिषदच्या अधिकाऱ्यांची?


गडचांदूर शहरात आपल्या प्रभागात असलेल्या समस्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाठवा....

मुबारक शेख
कोरपना ग्रामीण प्रतिनिधी
आधार न्युज नेटवर्क

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने