Click Here...👇👇👇

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विजय सिद्धावार यांची नियुक्ती #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विजय सिद्धावार यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी या नियुक्तीचे पत्र पाठविले.

विजय सिद्धावार, हे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार असून, मागील ३० वर्षापासून पत्रकारीतेत आहेत. महविदर्भ, महासागर, नागपूर पत्रिका, लोकसत्ता या वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम केले असून, त्यांचे विविध विषयावर राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रात लेखही प्रकाशित झाले आहेत. विजय सिद्धावार हे साप्ताहिक पब्लिक पंचनामा आणि पब्लिक पंचनामा या पोर्टलचे मुख्य संपादक आहेत. या क्षेत्रातील विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. विविध सामाजिक संघटनांशी ते जुडले असून, व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध शिबिर आणि प्रशिक्षण मेळावे आयोजित करून जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षित करू, असा विश्वास त्यांनी नियुक्तीप्रसंगी व्यक्त केला आहे.

विजय सिद्धावार यांची निवड झाल्याबद्दल, व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, प्रदेश सरचिटणीस के. अभिजीत, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांचे त्यांनी आभार मानले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाची कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार असून या संघटनेची जुळून कार्य करण्याकरिता 9422910167 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.