महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन #chandrapur

Bhairav Diwase
0

दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या फोटोला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची प्राचार्य प्रा.डॉ.बि.डी चव्हाण तसेच तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कल्याणी पटवर्धन , प्रा. बालमुकुंद कायरकर , प्रा. मोहितकर , प्रा. रजत मंडल तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा उपस्थित होत्या .


कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले. प्रास्ताविकतेत महाविद्यालयातील वर्षभरात सांस्कृतिक आणि समाजशास्त्र विभागा अंतर्गत राबविण्यात आलेल्या गरबा नृत्य प्रतियोगिता, मुलींना शैक्षणिक उपक्रमा व्यतिरिक्त महाविद्यालयात स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्याचे कार्य केले गेले आणि यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ नेहमीच मदतगार असते याबद्दल माहिती दिली . तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बी.डी चव्हाण यांनी खेळीमेळीच्या वातावरणातून सुप्त गुणांना वाव आणि कलाविष्कार कसे साध्य केले जाते याबद्दल मार्गदर्शन केले . तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी वर्षभरातील कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागात बद्दल अभिनंदन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य आणि रॅम्प वाक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक विभागा अंतर्गत पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. वरील सर्व स्पर्धेचे परीक्षण राजेश कैथवास व सौ .अरुणा राजूरकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी ओम कोराम , स्वप्निल गोपकर, उमाशंकर कोराम , प्रेरणा दिवटे प्रितेश बोरकर , प्रेरणा बोरकर, वैशाली तुमाने , जानवी रघुवंशी , अमन वर्मा दिलीप वर्मा ,जितेंद्र वर्मा, प्रज्वल तावडे ,स्नेहा तुमाने, पायल गायकवाड ,इत्यादी
विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी बरखा यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश टेकाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाची सर्व प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)