शॉर्ट सर्किटमुळे पीठ गिरणीला आग #chandrapur #bramhapuri #fire #firenews #Adharnewsnetwork


डाळ मशीनसह जनावरांचे कुटार जळून खाक


ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथे शाॅर्टसर्किटमुळे पीठ गिरणीला आग लागली. या आगीमध्ये पीठ गिरणीसह, डाळ भरडण्याची मशीन जळून खाक झाली. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजेदरम्यान घटना. ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

पिंपळगाव (भोसले) येथे प्रमोद टिकले यांची आटाचक्की, मिरची पिसाई, डाळ भरडायची चक्की आहे. नुकतीच त्यांनी आधुनिक पद्धतीची डाळ भरडायची मशीन विकत घेतली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान पीठ गिरणीला अचानक आग लागली. त्यानंतर शेजारी असलेले कुटार तसेच नवी डाळ मशीन जळाली. ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. लगेच अग्निशमन पथक आले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमध्ये टिकले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत