IPL सट्ट्यावर LCB ची धाड #chandrapur #LCB


चंद्रपूर:- सद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करण्याचे अनुसंघाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून कार्यवाही करण्याच्या त्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

शिवाजी नगर राधाकुण शाळेचे मागे तुकुम चंद्रपुर येथे राहणारा देविदास पडगीलवार हा इंडियन प्रिमीयर लीग २०२३ ( IPL 2023) के. के. आर. विरूध्द आर.सि.बि या क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाईलवर IPL क्रिकेट सट्टा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, टीव्ही, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ३०,०१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सट्टेबाज नामे १) देविदास दिलीप पडगीलवार वय ३२ वर्ष रा. दे. गो. तुकुम शिवाजी नगर राधाकृष्ण शाळेचे मागे चंद्रपुर २) पाहिजे आरोपी नामे अविनाश हांडे वय ३७ वर्ष रा. ताडबन वार्ड चंद्रपुर यांचे विरूद्ध पो.स्टे रामनगर येथे अप.क्र. ३४८ / २०२३ कलम ४५ मु. जु.का., सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो. उप. नि. अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार, पोका नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पंधरे, यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत