Pushpa 2: "तिरुपतीच्या जेलमधून पुष्पा फरार....," #Chandrapur #movie

Bhairav Diwase
0
निर्मात्यांनी जारी केलेला ‘तो’ अधिकृत व्हिडीओ चर्चेत


अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा २' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच आतुरता लागली आहे. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या पुष्पा या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुनने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले आहे. अशात पुष्पाच्या दुसऱ्या भागाबाबत आता एक अधिकृत खुलासा समोर आला आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमधे सर्वांसाठी हिरो होता. अभिनेत्री रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती.म्हणूनच आता चाहत्यांना दुसऱ्या पर्वाचे वेड लागले आहे.
चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत ट्विटरवर ‘पुष्पा 2’ बद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तो आता कुठे आहे, त्याची माहिती 7 एप्रिलला 4:05 PM ला कळेल. ‘शोध लवकर संपेल’ असे टीझरसोबत लिहिले आहे. या टीझरने अल्लूच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

'पुष्पा' चित्रपटाने फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. त्याने या भूमिकेसाठी अफाट मेहनत घेतली होती. त्याला पहिल्यांदा या रुपात पाहून चाहते थक्क झाले होते. त्यामुळे आता समोर आलेल्या व्हिडीओमुळे दुसऱ्या भागाची उत्कंठा आणखी वाढली आहे. यावरून आता नेटकऱ्यांनी 7 एप्रिलला 4:05 PM ला चित्रपटाचा टीजर येऊ शकतो असे कयास सोशल मीडियावर लावायला सुरुवात केली आहे.

आधार न्युज नेटवर्क व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/BR8TUVM58JuCHuo6bPkLar

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #nagpur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #digitalmarketing #pushpa2 #pushpamovie #Pushpa2movie #Pushpa2movietrailer #AlluArjunPushpa2movie #AlluArjunPushpamovie #AlluArjun # tirupatiJail #tirupati 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)