Top News

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू #chandrapur #gadchiroli #Prohibition


गडचिरोली:- साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. ०६ एप्रिल २०२३ रोजी हनुमान जयंती व १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव जिल्ह्यात साजरी करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात ०६ एप्रिल २०२३ चे ००.०१ वा. ते २० एप्रिल २०२३ चे २४.०० वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) लागु करण्यात आलेले आहे.

त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक ०६ एप्रिल २०२३ चे ००.०१ वा. ते २० एप्रिल २०२३ चे २४.०० वा. पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.


व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक दिनांक ०६ एप्रिल २०२३ चे ००.०१ वा. ते २० एप्रिल २०२३ चे २४.०० वा. पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश ०६ एप्रिल २०२३ चे ००.०१ वा. ते २० एप्रिल २०२३ चे २४.०० वा. वाजेपावेतो संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.

आधार न्युज नेटवर्क व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/BR8TUVM58JuCHuo6bPkLar

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने