Top News

चंद्रपूर जिल्ह्यात येलो, ऑरेंज अलर्ट जारी #chandrapur #rain



चंद्रपूर:- भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात ६ ते ८ एप्रिल या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यात एक, दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग ४०- ५० किमी प्रति तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून ६ व ८ एप्रिल २०२३ या दिवसाकरीता ''येलो अलर्ट'' व ७ एप्रिल या कालावधीत ''ऑरेंज अलर्ट'' जारी केला आहे.

विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा व गारा पडण्याची शक्यता बघता नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. वीजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीत मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. स्वसंरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले.

आधार न्युज नेटवर्क व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/BR8TUVM58JuCHuo6bPkLar

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने