'ती' गावे आधीच्याच खेडमक्ता साजा मध्ये समाविष्ट करा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

Google ads.

ब्रह्मपुरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर,खरबी व तुमडीमेंढा ही गावे यापूर्वी खेडमक्ता साजात होती.ब्रह्मपुरी तहसीलदार यांच्या साजा पुनर्रचना आदेशाने मौजा माहेर,खरबी व तुमडीमेंढा या गावांचा खेडमक्ता साज्यातून नाव कमी करून देलनवाडी साजामधे समावेश करण्यात आले. गावातील अनेक नागरिकांच्या शेतजमिनी खेडमक्ता साजात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळे ठिकाणाहून सातबारा काढणे हे शारीरिक व मानसिक त्रासाचे होणार आहे त्यामुळे माहेर,खरबी आणि तुंबडीमेंढा ही गावे पूर्वीच्या खेड मतदार तलाठी साजामधे समाविष्ट करण्यात यावे गावकऱ्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळेल खेड मतदार वरील तिन्ही गावे समाविष्ट न झाल्यास शिवसेना व गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा प्रस्तुत निवेदनातून देण्यात आला तालुक्यातील ग्रामपंचायती माहेर, खरबी व तुमडीमेंढा या गावांना देलनवाडी साजातून वगळून पुनश्च खेळ साज्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या नेतृत्वाखाली मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,महसूल मंत्री,पालकमंत्री चंद्रपूर तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांना तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्यामार्फत देण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख ब्रह्मपुरी तथा सरपंच केवळराम पारधी,शामराव भानारकर माजी शहर प्रमुख,गुलाब बागडे विभाग प्रमुख,मोतीराम अमृतकर,राजनंदिनी मेश्राम,विद्या मेश्राम,मेघा सोरटे,गणेश बागडे शाखाप्रमुख,वनिता कोलते, शुल्काबाई मेश्राम,नीता बोरघरे, ज्योती गेटकर,पुनम अमृतकर, बुधाजी अमृतकर,नयना कराटे,गोपीचंद मेश्राम,सुनंदा ठवरे,सुधाकर बनकर,मोहनदास राखडे,केवळराम चहांदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)