खासदार साहेब आमच्या घरकुलांचा प्रश्न सोडवा:- ठाकरे #chandrapur #chimur

Bhairav Diwase


चिमूर:- दि.4/05/2023 ला चिमूर येथे चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया हे सुद्धा उपस्थित होते.


चिमूर तालुक्यातील आंबोली, कवडशी (डाक) या गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र ड यादीतील संपूर्ण घरे (387) विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत. ग्राम पंचायत आंबोली ने याचा वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यात भरपूर गरिबांची घरे खराब झालेली आहेत. अनेक गरिबांना बेघर होण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे खासदारांनी या गंभीर विषयावर लक्ष घालावे अशी मागणी वैभव ठाकरे यांनी केली. यासोबतच महावितरण विभाग, कृषी विभाग तसेच नवीन तयार होणाऱ्या रस्त्यांच्या गुणवत्तेवर, आंबोली-शंकरपूर रस्त्यावर होणाऱ्या अपघातावर वैभव ठाकरे यांनी प्रश्न विचारले.