Top News

उच्चदाब वाहिनीवरुन केबल टाकण्याचा प्रयत्न जीवावर बेतला #chandrapur #pune


एकाचा मृत्यु, एक जखमी


पुणे:- उच्च दाब वाहीनीवरुन खाजगी केबल टाकण्याचा प्रयत्न करत असलेल्या कामगारांना वीजेचा जोरदार धक्का बसला आहे. यामध्ये एक कामगाराचा मृत्यू झाला आहे तर एक कामगार जखमी आहे.

कुलर’चा वापर जपून करा; अपघात टाळा!


पुण्यातील कोथरुड भागातील घटना ही घटना आहे. कुंडलीक लक्षमण शिंदे असे मृत कामगाराचे नाव आहे तर स्वप्नील बोडके असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

स्थानिक नेटवर्कसाठी काम करणारे हे दोघे जण इमारत मालकाच्या परवानगीशिवाय दुपारी इमारतीच्या टेरेसवर चढले. टेरेसवरून महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही वाहिनीच्या तारेवरून फायबर ऑप्टीक केबल फेकण्याचा या दोघांनी प्रयत्न केला. परंतु सदर कंबल चालु वाहिनीच्या तारेवर पडली आणि त्यामुळे सदर लाईन ११:५१ वाजता ट्रिप झाली आणि त्या दोघांना विजेचा जोरदार धक्का बसला.

यामध्ये कुंडलीक लक्षमण शिंदे, वय ३१ वर्ष हे या घटनेत गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केले. दुसरी व्यक्ती स्वप्नील बोडके, हे ७५ टक्के भाजल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला झाला आहे. शिंदे यांच्यामागे आई, पत्नी व दोन मुले आहेत. यातील एक मुलगा दिव्यांग आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने