Google ads.
गडचिरोली:- देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन इमारतीच्या शीलान्यास आणि दीक्षांत समारंभाला येण्याची शक्यता असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गडचिरोली-चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या शीलान्यास आणि दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली.
यावर राष्ट्रपती कार्यालयाकडून होकारात्मक उत्तर आल्यास राष्ट्रपती मुर्मू गडचिरोलीला येऊ शकतात, अशी माहिती खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबतच्या हालचाली आत्तापासूनच सरू असल्याचीही माहिती आहे.