विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू #chandrapur

Bhairav Diwase



Google ads.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सचिन जसवंतसिंग चौव्हान (३४) रा. इंदिरानगर, घुग्घुस असे मृताचे नाव आहे.

हा युवक घराच्या पाठीमागील खोलीत गेला असता जिवंत वीजप्रवाह लागून असलेल्या लोखंडी खांबाला त्याच्या हाताचा स्पर्श झाला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.