ट्रक फसले; महामार्ग ठप्प #chandrapur #Korpana

Bhairav Diwase

Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना-वणी राज्य महामार्गावरील वणी तालुक्यातील खादला येथे दोन ट्रक फसल्याने गुरुवारी सात तास वाहतूक ठप्प होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरपना ते वणी मार्गावरील खादला येथे नवीन पूल निर्मितीचे काम सुरू आहे. या पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता काढून देण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर चिखलामुळे दोन ट्रक फसल्याने सात तास वाहतूक ठप्प होती. या महामार्गावर वणी, कोरपना, गडचांदूर, शिंदोला व घुग्घुसकडे दिवसभर जडवाहतूक चालते. सात तास मार्ग बंद झाल्याने वाहतूक कोलमडली. सहा तासानंतर मार्ग खुला झाला.