वरोऱ्यातील घरी खा. धानोरकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
चंद्रपूर:- काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
मागील दोन दिवसांपासून बाळू धानोरकर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे कुटुंबिय देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्य प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काल मिळत होती. मात्र आज सकाळी 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. नागपूर वरुन खा. बाळू धानोरकर यांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका वरोऱ्याला रवाना झाली होती. आ. प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत शिवानी वडेट्टीवारही वरोऱ्याला रवाना झाले होते. खा. बाळू धानोरकर यांचं पार्थिव वरोऱ्यात दाखल झाले असून वरोऱ्यातील घरी खा. धानोरकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे. जिल्ह्यातील व राज्यातील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते अंत्यदर्शनासाठी येणार आहे.