Top News

वडिलांच्या अंतिमदर्शनाचा ठरला खासदार बाळूभाऊंचा अखेरचा फोटो! Chandrapur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे महाराष्ट्रातील कॉग्रेसचे एकमेव खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर यांचा वडिलांचे अंतिम दर्शन घेतांनाचा सार्वजनिक जीवनातील अखेरचा फोटो ठरला.

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वडील सेवानिवृत्त जि. प. मुख्याध्यापक नारायणराव धानोरकर यांचे नागपूर येथे वृध्दापकाळाने तीन दिवसापूर्वी (२७ मे २०२३) निधन झाले. प्रकृती स्वास्थ्यामुळे खासदार धानोरकरही दवाखान्यात भरती होते. बाळूभाऊंना वडिलांचे निधन झाल्याचे कळताच दवाखान्यातच त्यांनी आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेतले होते. प्रकृतीमुळे वडिलांच्या अंतिमसंस्काराला खासदार धानोरकरांना उपस्थित राहता आले नाही.

खासदार बाळूभाऊ यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपूर येथून त्यांना दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. प्रकृतीवर सुधारणा होत असतांना अचानक त्यांची आज ३० मे २०२३ ला पहाटे २.३० वाजाता प्राणज्योत मालवली. एका क्षणात ते आपणा सर्वांना पोरके करून गेलेत. त्यांनी अचानक घेतलेली एक्झीट मनाला चटका लावून देणारी ठरली.

शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार हा बाळूभाऊचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. भाऊंनी शिवसेना कार्यकर्ता, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार अशी चढत्या क्रमाने पदे भुषविली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विकासकामे मार्गी लावलीत. भाऊ आपण आम्हाला सोडून गेले असले तरी आपली आठवण आम्हाला नेहमीच होणार आहे.

बाळूभाऊ अमर रहे, अमर रहे!

भाऊ, आपणाला अश्रूपूर्ण आदरांजली!

अरूण उमरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने