मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्वनियोजित चंद्रपूर दौरा रद्द #chandrapur


चंद्रपूर:- कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे काल (ता. ३०) पहाटे दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. एअर ॲम्ब्यूलन्सने काल त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी वरोरा येथे आणण्यात आले. आज सकाळी निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाली आणि वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरोरा येथे आज सायंकाळी ६ वाजता खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार होते. असा पूर्वनियोजित दौरा होता. मात्र आज 31 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्वनियोजित चंद्रपूर दौरा रद्द करून इतरत्र वळविण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत