Top News

व्यावसायिकांना लागली चिंता, कुलर विकायचा की छत्री? #Chandrapur


ऋतूचे काहीच समजेना! थंड पेयाची विक्रीही मंदावली

चंद्रपूर:- हवामानातील वातावरणाच्या बदलामुळे ऋतूचे गुणधर्मच बदलून गेले आहेत. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे वेळोवेळी आगमन होत आहे. शहरातील व्यावसायिकांनी दुकानात उन्हाळ्यातील थंड हवा देणारे कुलर विक्रीस उपलब्ध केले होते; परंतु सतत आठवडाभरापासून होणाऱ्या पावसामुळे छत्री विकण्याचा व्यवसाय वाटावा का, असा विचार करण्याची पाळी व्यावसायिकांवर आली आहे. वातावरणातील हवामान बदलामुळे मेघगर्जना, पाऊस, वारा, वादळ व गारा पडत आहेत.

उन्हाळ्याचे दिवस असून ऋतूतील निसर्गातील वातावरणाने थंडगार केलेले आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान अधिक असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात व्यावसायिक कुलरची विक्री अधिक प्रमाणात करीत असतात. उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने नागरिकांना छत्रीचा वापर करावा लागत आहे. कुलर व्यावसायिक उन्हाळा असल्याने महागडे कुल विक्रीस आणलेले होते; परंतु पाऊ पडत आहे. त्यामुळे कुलर सोडून आत छत्रीचा व्यवसाय करावा लागणार क असा प्रश्न पडला आहे.
सोशल मीडियावरही मनोरंजक चर्चा

या बदलत्या वातावरणाबाबत सोशल मीडियावरही बऱ्याच मनोरंजक चर्चा सुरु आहेत. 'व्यापारी चितेत: कुलर विकायचा की छत्री?', 'लग्नातील नवरदेव शेरवानी घालणार की रेनकोट असे विविध प्रकारचे संदेश सोशल मीडियावर बघावयास मिळत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने