Top News

चालत्या ट्रेन मधून मोबाईल खाली पडला तर काय करावे? #Chandrapur #railwaystation #Maharashtrarailway #whareismytrainआजही आपल्या देशात लोक प्रवास करण्यासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात , रोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात . प्रवासात लोक वेळ घालवण्यासाठी मोबाईल फोन चा हि वापर करतात .अशातच जर तुमचा मोबाईल चालत्या ट्रेन मधून खाली पडला तर काय कराल ? अशा परिस्थिती मध्ये लोक जास्त करून एक तर चुपचाप बसून जातात किंवा ट्रेनची इमर्जेन्सी चैन{Emergency Alarm chain } ओढतात. पण असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे . त्यामुळे आज आम्ही तुम्हाला , चालत्या ट्रेन मधून मोबाईल किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू खाली पडली तर काय करावे या विषयीची माहिती देत आहोत.

हेही वाचा:- आता जनरल रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही

ट्रेन मधून मोबाईल खाली पडला म्हणून चैन ओढली तर काय होते ?

अनेकवेळा चालत्या ट्रेन मधून मोबाईल खाली पडल्यावर सर्वप्रथम तुमी ट्रेनची चैन ओढून गाडी थांबत असाल तर असे करण तुम्हाला महागात पडू शकते कारण इंडियन रेल्वे कायदा १९८९ च्या कलम क्र १४१ नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही विशेष कारणाशिवाय ट्रेन ची चैन ओढल्यास त्या व्यक्तीला १००० रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा:- Waiting Ticket वर प्रवास करताय?

आता तुम्ही विचार करत असाल कि १००० रुपये दंड भरून मी १०,००० रुपयाचा मोबाईल वाचवू शकतो. पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, तुम्हाला ३ महिने ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते शिवाय दंडाची रक्कम हि ६००० ते १०,००० रुपये आकारली जाते. त्यामुळे मोबाईल खाली पडला म्हणून तो परत मिळवण्यासाठी चैन ओढल्यास मोबाईल तर परत मिळणार नाही या उलट तुम्हाला अनेक समस्या चा सामना कराव लागू शकतो.

हेही वाचा:- ब्रोकरची नाही गरज, आता घर बसल्या मिनिटांत 'असे' बुक करा रेल्वेचे कन्फर्म तिकीट, पाहा स्टेप्स"


ट्रेनची चैन कोणत्या परिस्थितीत ओढली जाऊ शकते?

१. जर कोणतीही व्यक्ती किंवा लहान मुल खाली राहील असेल आणि ट्रेन चालू झाली असेल तर

२.ट्रेन मध्ये आग लागली असेल तर

३.वयस्क किंवा अपंग व्यक्तीला चढायला वेळ लागत असेल आणि ट्रेन चालू झाली असेल तर

४.अचानक एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडली तर जसे कि, हार्ट अटक इ.

५.ट्रेन मध्ये हाणामारी ,चोरी किंवा लूटपाट अशी घटना घडली असेल तर


ट्रेन मधून खाली पडलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी काय करावे?

ट्रेन मध्ये प्रवासा दरम्यान अचानक तुमचा मोबाईल खाली पडल्यास सर्वप्रथम रेल्वेच्या ट्रेक च्या बाजूला असणार्या खांबावरील नंबर किंवा साईड ट्रेक चा नंबर नोट करून घ्यायचा आहे. नंतर जवळच्या बसलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये whare is my train (https://play.google.com/store/apps/details?id=com.whereismytrain.android) ॲप असेल तर कोणत्या दोन स्टेशन च्या मध्ये गाडी आहे ते पहावे. नंतर लगेच कोणत्याही प्रवासी व्यक्तीच्या फोनवरून रेल्वे पोलीस आणि १८२ नंबर वर सूचना द्यायची आहे.

१८२ नंबर वर फोन करून तुमचा मोबाईल कोणत्या नंबरच्या पोल किंवा ट्रेक जवळ पडला आहे या विषयीची अचूक माहिती द्यायची आहे . जेणेकरून पोलिसांना तुमचा मोबाईल शोधणे सोपे जाईल व तुमचा मोबाईल लवकर मिळेल. कारण पोलीस लगेच त्या जागेवर पोहचतील. या नंतर पोलीसा कडून कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यनंतर तुम्हाला तुमचा मोबाईल परत मिळेल .

रेल्वे हेल्प लाईन नंबर - Railway HelpLine Number

182 R.P.F. म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स चा आल इंडिया सेक्युरिटी चा हेल्प लाईन नंबर आहे .रेल्वे मध्ये तुम्ही कोणत्याही वेळी या नंबर वर मदत मागू शकता.

तसेच G.R.P चा हेल्प लाईन नंबर 1512 असून कोणत्याही प्रकारच्या सेक्युरिटी ची मागणी करता येते .रेल प्रवासी हेल्प लाईन नंबर 138 आहे आणि प्रवासा दरम्यान कोणतीही अडचण असेल तर या नंबर वर तुम्ही मदत मागू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने