आता जनरल रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही #chandrapur #railway #UTSOnMobile

Bhairav Diwase
0

'या' अ‍ॅपवरुन करा बुकिंग


अनारक्षित जनरल तिकीट बुकिंगसाठी रेल्वेने UTS On Mobile सुरू केले आहे. याद्वारे प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर लांबच लांब रांगेत उभे न राहता जनरल तिकीट काढता येणार आहे. रेल्वे स्टेशनवर जनरल तिकीट खरेदी करणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मर्यादित संख्येत काउंटर आणि प्रवास करणारे जास्त असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. अशा वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काही वेळा तिकीट न मिळाल्याने ट्रेनही चुकते.अ‍ॅप कसे वापरावे

UTS On Mobile https://play.google.com/store/apps/details?id=com.cris.utsmobile अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर स्वतःची नोंदणी करा.

नोंदणी करताना मोबाईल नंबर, नाव, जेंडर, जन्मतारीख विचारल्यानंतर पासवर्ड तयार करा.

त्यानंतर ही प्रक्रिया ओटीपीद्वारे पूर्ण होईल.

नोंदणीनंतर, स्क्रीनवर एक विंडो दिसेल. ज्यामध्ये बुक तिकीट, कँसल तिकिट, बुकिंग हिस्ट्री, आर वॉलेट, प्रोफाइल, शो बुक्ड टिकट, मदत आणि लॉगआउट हे पर्याय दिसतील.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)