शॉर्ट सर्किटमुळे कापसाला आग #chandrapur #Korpana #fire #firenews #Adharnewsnetwork

Bhairav Diwase
0

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील एका घरात साठवलेल्या कापसाला विद्युत शॉर्ट सर्टमुळे आग लागल्याची घटना शनिवार दि. १५ ला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. Cotton fire due to short circuit

मिळालेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील रामचंद्र झोलबाजी वासेकार यांनी कापूस वेचणी झाल्यानंतरचा कापूस जुन्या घरात साठवून ठेवला होता. आज १० वाजताच्या सुमारास अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तेथील ५ क्विंटल कापूस, दरवाजा, कवेलुचे तीन पत्राचे नुकसान झाले. 

या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी तलाठी कमलवार, पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)