एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून खून #sangli #chandrapur #Adharnewsnetwork #murder


सांगली:- शहरामध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (13 एप्रिल) सायंकाळी घडली.

भर रहदारीच्या ठिकाणी थरारक पद्धतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या खून प्रकरणी संजय नगर पोलिसांनी चार तरुणांना अटक केली. केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केला. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळ जनक घटना घडली. राजवर्धन राम पाटील, वय 18 वर्षे असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या