Click Here...👇👇👇

पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्ती घोषणेनंतर खळबळ #chandrapur #NCP

Bhairav Diwase

चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


चंद्रपूर:- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्षपदाच्या निवृत्ती घोषणेनंतर पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी पद सोडल्यापासून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षातही राजीनामा देणे सुरू झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवा केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

यादरम्यान वैद्य यांनी आपले निवेदन जारी केले की, "आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करू. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार नसतील तर आम्हीही आमच्या पदावर राहणार नाही. आम्ही सर्व पवार यांच्या सोबत आहोत. नुकतीच शरद पवार यांनी भाकरी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. पवार साहेबांना जिल्ह्यात काही बदल करायचे असतील तर तेदेखील करू शकतात, असेही वैद्य म्हणाले.