लग्नाचे आमंत्रण सोशल मीडियावर #chandrapur #socialmedia

Bhairav Diwase

संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर:- आजच्या इंटरनेट युगात वावरत असताना सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सध्या याच सोशल मीडियाचा वापर लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी केला जात आहे. यामुळे वधू आणि वर पित्याची लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होत आहे.

सर्वसाधारण माणूस आजमितीस सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त करीत असल्याचे दिसत आहे. याच सोशल मीडियाचा वापर वधू-वर पित्यांना आमंत्रणासाठी उपयुक्त व किफायतशीत ठरत असून बहुतांशी लोकांनी लग्न आमंत्रण पत्रिका छापणे या विषयाला बगल दिलेली दिसत आहे. सध्या एप्रिल व मे महिन्यात मोठी लग्नसराईची धूम आहे. आपल्या घरातील लग्न कार्याचे आमंत्रण नातेवाईक व मित्रपरिवारात देण्यासाठी व्हॉट्सॲप व फेसबुक तसेच इतर माध्यमांचा उपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी आपल्या घरातील लग्नकार्यात आमंत्रण पत्रिका वाटणे हे सर्वात मोठे व कठीण काम समजले जात होते. आता या प्रथेला वधू-वर मंडळींकडून छेद देत सोशल मीडियाचा वापर करून आमंत्रण पत्रिका देत आहेत. तर जास्त जवळीक असलेल्या नातेवाईकांना आठवणीत एक फोन करुन आमंत्रण दिले जात आहे.!
पूर्वी लग्न सराईत प्रत्येकाची घरी लग्न पत्रिकेचा खच पडलेला असायचा. ऐपत नसेल तरी कर्ज काढून का होईना पण आमंत्रण पत्रिका ही छापावीच लागत होती.. आता या प्रथेला कुठेतरी बगल देतांना वधू-वरांचे नातेवाईक दिसत आहेत.. लग्न आमंत्रण पत्रिका छापण्याचे प्रमाण फारच कमी झाले असून स्वागतार्ह बाब आहे. लग्न कार्य म्हटले की, लग्नपत्रिका छापणे कुटुंबातील नावे त्यात टाकणे त्यावरुन होणारे रुसवे-फुगवे असे प्रकार घडत होते.