जि. प. उच्च प्राथ. शाळा सुमठाणा येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन. Rajura

Bhairav Diwase



राजुरा:- जि.प.उच्च प्रा.शाळा सुमठाणा पं.स.राजुरा येथे दि.01-05-2023 ला शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी दाखलपात्र विद्यार्थी व माता पालक , शा व्य स अध्यक्ष सौ.साठोणेताई ,सदस्या सौ नीता माणुसमारे , श्री दादाजी माणुसमारे, ग्रा.पं सदस्य श्री कुबडेजी ,अंगणवाडी सेविका सौ पूनम येरणे व सौ .येरणे तथा मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

शाळेचे मु .अ.डाँ.श्री मधुकर कोटनाके सर यांनी प्रास्तविक भाषणातून मेळाव्याची गरज यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तसेच शाळेतील पहिले पाऊल पुस्तिकेचे सखोल मार्गदर्शन सौ.वैशाली भोयर यांनी तसेच आभारप्रद्शन सौ.इंदिरा पहानपटे मँडम व मेळावा यशस्वी करण्यात श्री मारोती झाडे सर व श्री विठ्ठल थेरे यांनी मोलाचे सहकार्य केले.