https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- घरात कुणी नसल्याची संधी साधून येथील एका घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी व प्रभाकर मामुलकर महाविद्यालयात कार्यरत कर्मचारी सुरेश आपटे यांच्या घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ५३ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
आपटे हे बाहेरगावावरून सकाळी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पंचनामा केला. या घटनेमध्ये सोन्याचा गोफ, मंगळसूत्र, डूल, चांदीचे चाळ, जोडवे असा एकूण ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप ऐकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहेत.