मन मंदिरा - वारी नव्या विचारांची या लोकप्रिय मालिकेत करणार विचारांचा जागर
अमरावती:- 'तरुण' आणि 'व्याख्यान' ही संकल्पना आली की सोपान कनेरकर यांचं नाव अग्रक्रमावर सध्या घेण्यातयेते. कालपर्यंत व्याख्यान हा शब्द ऐकला नाक मुरडणारी युवा पिढी आज कनेरकर यांच्या व्याख्यानात तासनतासचिकटून राहतात. व्याख्यान या संकल्पनेला उच्च पराकोटीवर नेण्याचे कार्य सध्या कनेरकर करत आहे.
आपल्या प्रबोधनातून मुख्यतः आजच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि शिकवणीतील विद्यार्थ्यांना 'भगवद्गीता'द्वारेयशाचा मूलमंत्र युवकांना आवडेल त्या भाषेत सांगण्याचं कर्तब कनेरकर त्यांच्या विनोदी शैलीत हसत हसत अंतत: अक्षरशः विद्यार्थ्याना रडवून ठेवतात. यामुळे कनेरकर सध्या युवा व्याख्याते व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणूनसर्वश्रुत प्रसिद्ध आहे.
नेहमी भारतीय संस्कृतीचा आग्रह करत युवक,युवती, स्त्रिया, पुरुष यांना वृद्धाश्रम ही संकल्पना बंद करण्याचा संकल्पआपल्या विचारातून देतात. 'पाछात्य संस्कृती ही द्राक्षांसारखी आहे तर भारतीय संस्कृती ही रुद्राक्षासारखी आहे' हेत्यांचं वाक्य सर्वश्रुत आहे. प्रत्येकात विवेकानंद, विज्ञान आणि अध्यात्म, Secret success from Bhagvadgita, Branding, Positioning, Marketing from Bhagvadgita, भारतीय संस्कृती, जागर तरुणाईचा, कृष्णनीती, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, माणूस माझं नाव हे व्याख्यानचे विषय नावाजले आहेत. त्याच बरोबर विद्यार्थी आणिशिक्षकाचे नाते सांगणारे शिक्षकांचे गट संमेलन असो की जिल्हा परिषद पंचायत समितीचे विवीध प्रशिक्षण असोसोपान कनेरकर विशेष निमंत्रित असतात.
सोपान कनेरकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील, मोर्शी तालुक्यातील चिखलसावंगी या छोट्याश्या गावातमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील वाणीभुषण गुरुवर्य कनेरकर महाराज असल्याने वक्तृत्वाचे बालकडू घरातूनच मिळत गेले. अगदि वयाच्या 9 व्या वर्षी पहिले कीर्तन करण्याचे धाडस सोपान यांनी केले व तेथेच मुहूर्तमेढ जोडली.
✅
संपूर्ण महाराष्ट्रात चिंतन-मंथनातून आशयगर्भ विषयाची मांडणी करीत, श्रोत्यांना आपल्यासोबत त्या विषयात घेवूनजात, त्यांच्या काळजाला हात घालत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारी तर कधी हसवणारी तर कधी अंगारासारखीबेभान पेटवणारी, नव्या परिवर्तनाच्या लढाईला सिद्ध करणारी त्यांची शैली प्रत्येकाला मंत्रमुग्ध करुन सोडणारी...! तितकीच विलक्षण प्रेरणा देणारी...!!!!
जीवनाच्या शाळेत तरुणांना वास्तविकतेच दर्शन घडवतोय, देशाप्रती तरुणांचे प्रेम आणि कर्तव्याची जाण करून देतो, त्यांच्यात जोश निर्माण करतो, तरुणांना स्वतःवर प्रेम करायला शिकवतो कारण कधीच न उतरणारी नशा त्यालाचढली आहे फक्त माणूस घडवायची.
विशेषतः महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी महाविद्यालय येथे युवकांशी संवाद साधण्यासाठी नेहमीआमंत्रित.
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आदी प्रबोधनात्मक विषयांवर तरुणांसाठी विशेष कार्यशाळा घेत असतात.
आपल्या प्रबोधनातून मुख्यतः विद्यार्थ्यांना 'भगवद्गीता'द्वारे यशाचा मूलमंत्र युवकांना आवडेल त्या भाषेत सांगण्याचंकार्य सोपान कनेरकर करीत आहे.... नेहमी भारतीय संस्कृतीचा आग्रह करत प्रत्येकांना वृद्धाश्रम ही संकल्पना बंदकरण्याचा संकल्प आपल्या विचारातून देतात. 'पाछात्य संस्कृती ही द्राक्षांसारखी आहे तर भारतीय संस्कृती हीरुद्राक्षासारखी आहे' हे त्यांचं वाक्य सर्वश्रुत आहे.
झी टॉकीज वर येणार्या लोकप्रिय महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आणि कीर्तनकार्यांच्या मन मंदिरा या गाजणार्याकार्यक्रमामध्ये मध्ये सोपान कनेरकर 1,2,3 जून ला संध्याकाळी 6 वाजता विचारांचा जागर करणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींनी, वक्त्यांनी व महाराज मंडळींनी महाराष्ट्रभरात आवाहन केले आहे. यामध्ये श्रीजितेंद्रनाथ महाराज, नितीन बानुगडे पाटील, धनंजय भाई देसाई, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार निलेश लंके, आमदार रवी राणा, राजेंद्र जंजाळ, कुशल बद्रिके, सुप्रिया साठे, भारतगणेशपुरे, पुरुषोत्तम दादा महाराज पाटील , कबीर महाराज आत्तार , मंगल आप्पा बांदल, लप्पीशेठ जाजोदिया, विठ्ठलकांगणे सर, अनिकेत घुले, सोपान महाराज सानप यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत