(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.26 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शाहूमहाराज यांचे प्रतिमेला बौध्द पंच कमेटी, मालेवाडा चे अध्यक्ष आयु. जगदीश आ. रामटेके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
आयु. जगदीश रामटेके आयु. प्रदीप मेश्राम यांनी "छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य" या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. या प्रसंगी आयु. वामन वाघमारे, विराज गजभिये, प्रशिक बहादुरे, सूरज गजभिये, अर्णव वाघमारे, आदी. उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयु. योगेश मेश्राम यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत