कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची सुटका #chandrapur #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा फाटा येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांच्या वाहनावर भद्रावती पोलिसांनी कारवाई करून सहा जनावरांची सुटका केली. ही कारवाई पहाटे चारच्या दरम्यान करण्यात आली. स्वप्निल उर्फ सोनू स्वानंद शेंडे ,समीर आयुब कुरेशी दोन्ही राहणार चंद्रपूर असे आरोपींची नावे आहेत. ठाणेदार बिपिन इंगळे यांना गुप्त माहिती मिळाली की, नागपूर- चंद्रपूर मुख्य मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ चार चाकी वाहनाद्वारे जनावरांची तस्करी होत आहे. त्या आधारे नाकाबंदी करून या वाहनाची तपासणी केली असता त्यात सहा जनावरे किंमत एक लाख तीस हजार व वाहन जप्त करण्यात आले यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
भद्रावती पोलिसांची आठवडाभऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.सदरची कारवाई वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात पो. नि. बिपीन इंगळे, गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. मुळे, पोलीस अंमलदार अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या