राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे फक्त दाखवण्यासाठी पाहिजेत:- #chandrapur

Bhairav Diwase
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्र

चंद्रपूर:- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावी, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना मिळावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्र सोडले आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसला पक्षात केवळ चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी हवे आहेत. पदं देण्यासाठी नको, अशी टीका त्यांनी केली. चंद्रपूर येथे आयोजीत भाजपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य ओबीसी घरातील मुलगा आज देशाचा पंतप्रधान म्हणून संपूर्ण विश्वात भारताचा तिरंगा फैरावत आहे. यापेक्षा मोठा ओबीसींचा सन्मान काय असू शकतो.

आपण कालही पाहिलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सगळे खासदार मोदींचं कशाप्रकारे स्वागत करत होते. त्यातून खऱ्या अर्थाने मोदींचा मान वाढलाच पण मोदींपेक्षाही भारताचाही मान वाढला. आज देशाच्या मंत्रिमंडळात जेवढे ओबीसी मंत्री आहेत, इतके ओबीसी मंत्री यापूर्वीच्या कुठल्याही मंत्रिमंडळात नव्हते. हा एक ओबीसी मंत्र्यांचा रेकॉर्ड मोदींच्या मंत्रिमंडळाने पूर्ण केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)