लाकडाने भरलेला ट्रक पुलावर आदळून लटकला #chandrapur #accident #saoli


चंद्रपूर:- ओडिशा येथून बल्लारपूरकडे निलगिरीचे लाकडे घेऊन येणाऱ्या ट्रकसमोर बैल आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यामध्ये ट्रक थेट पुलावर आदळून लटकला. या घटनेमध्ये सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील व्याहाड (खु.) गावाजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

सदर ट्रक (एमएच ३४ बीपी ५५५६) हा ओडिशा येथून बल्लारपूरकडे निलगिरीचे लाकडे घेऊन निघाला. दरम्यान, व्याहाड खूर्द गावाजवळील शेंडे यांच्या राईसमील समोर ट्रकच्या समोर बैल आला, यावेळी बैलाला वाचविण्यासाठी ट्रकचालकाने ब्रेक मारले, मात्र नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुलाला धडक दिली. यामध्ये ट्रक पुलावर लटकला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर दुसरा ट्रक बोलावून त्यामध्ये लाकडे भरण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत