दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाणीच्या विस्तारी करणाला चंद्रपूर शहरातील पर्यावरण कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी पर्यावरण दिनी एकत्र येत थेट खाण क्षेत्रात जाऊन विरोध दर्शविला. ही खाण मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे जल, जंगल आणि वाघाचा अधिवास कमी केला असून येथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे. पुन्हा नव्याने या जिल्ह्यात दाट जंगल कोळसा खाणींच्या घशात टाकू नये, अशी मागणीही पर्यावरण प्रेमींनी केली आहे. (Opposition to Durgapur coal mine expansion)
महाराष्ट्र शासनाने आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणीला मंजुरी दिली आहे. अतिशय दाट जंगल असलेली सुमारे ३०० एकर जमीन या कोळसा खाणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. ही खान १३ वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या अदानी कोळसा ब्लॉकला लागून, सिनाळा गावाजवळ आहे. या खाणीच्या परिसरात किमान आठ ते दहा वाघ आणि असंख्य वन्यजीव असल्याने चंद्रपूर परिसरात पर्यावरण आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या खाणीला विरोध करण्यासाठी इको प्रोचे बंडू धोत्रे, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश दूधपचारे, दीपक दीक्षित, अनिल राइन्कवार, ॲड. मलिक शाकिर, किशोर जामदार, नितीन रामटेके, शेख वाजिद, विजय साळवे, डॉ आशिष महातळे, जयेश बेले, अतुल वासुदेव, मनीष गावंडे, भूषण ढवळे, अरुण सहाय, मनोज पोतराजे, भूषण फुसे, संजय जावडे, राजू काहीलकर, सुनील लिपटे, सुमित कोहळे, जयेश बैनालवार, बंडू दुधे, अनिल ठाकरे आदींनी उपस्थिती लावली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)