आमदार धर्मराव बाबा आत्राम उद्या ब्रम्हपुरीत #chandrapur #bramhapuri


ब्रह्मपुरी:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळावी. तसेच पक्षाच्या ध्येय धोरण निश्चित करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आ. धर्मराव बाबा आत्राम हे दिनांक ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता ब्रह्मपुरी येथील स्थानिक विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या ब्रह्मपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आडावा बैठकीला उपस्थित राहून विविध विषयावर चर्चा करणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह संचारलाआहे.यासाठी सदर कार्यक्रमाला तालुक्यातील बऱ्याच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोधर मिसार,ब्रह्मपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अविनाश राऊत,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अश्विन उपाशे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत