हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन #chandrapur #Chandrapurpolice

Bhairav Diwase
चंद्रपूर:- साखरवाही येथील दिपाली राजेश कुट्टे वय 19 वर्ष ही महिला दि. 4 जुन 2023 रोजी सकाळी 9 ते 5.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. तसेच दिपाली राजेश कुट्टे या महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती आढळून आली नाही.
हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय 19 वर्ष, रंग सावळा, उंची 5 फूट, मजबुत बांधा, डोक्याचे केस काळे व लांब, अंगात शेदंरी रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला आहे. अंगावर मौल्यवान वस्तु नाहीत.

सदर वर्णनाची महिला आढळून आल्यास पडोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार 9664065553, पोलीस नियत्रंण कक्ष 07172-251200 तसेच पोलीस हवालदार सुभाष कुळमेथे 9850301285 यांच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस स्टेशन, पडोलीच्या वतीने करण्यात आले आहे.