गडचांदूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ #chandrapur #Korpana


आठ जणांना घेतला चावा

कोरपना:- गडचांदुर शहरात आज सकाळपासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. सकाळी पहाटे पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत सात जणांना कुत्रा चावला असून लहान मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

भंडारा कॉलनी येथील पिसाळलेल्या एका कुत्र्याने पहाटे पाच वाजता एक जणाला चावला. नंतर भाजी मार्केट येथे सुद्धा लहान मुलाला कुत्र्याने जखमी केले. शहरात अनेक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.
गडचांदूरात पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केलेल्या व्यक्तींची नावे रवी वाकडे, ऋषिकेश कावडे, पांडुरंग तिखट, संजय बिंदू, उद्धव कुंभारे, अशोक भगत, रमेश चौधरी, करणुबाई कुळमेथे असे आहेत.
आपल्या सर्व लहान मुलांची काळजी पालकांनी घ्यावी. तो कुत्रा कुठे आहे? हे अजून माहित झाले नाही. तरी सर्व गडचांदूर शहरवासी यांनी सावध रहावे व लहान मुलांना बाहेर जाऊ देऊ नये काळजी घ्या अशे आव्हान प्रहारचे बिडकर यांनी केले

आता पर्यंत या आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. अजून आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा आपल्या मुलांना सांभाळा एकट कुठेही पाठवू नका

वीस-पंचवीस दिवस आधी ग्रामीण रुग्णालय वसाहतीच्या परिसरात एका कुत्र्याने तीन जणांना गंभीर जखमी केले होते. त्यावेळेस ग्रामीण रुग्णालयातून नगरपरिषद ला पत्रव्यवहार करण्यात आला. पण नगरपंचायत प्रमोद वाघमारे यांना विचारणा केली असता त्यांनी पत्र आलेच नाही असं म्हटलं. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील ओसी बघितली असता पत्र दिले व वाघमारे यांनी नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांस फोन करून विचारले असता पत्र आलेले आहे असे कळले यावरूनच नगरपरिषद किती दक्ष आहे हे कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या