देशाच्या प्रगतीसाठी कोणतीही कृती नाही; स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचे! #Chandrapur #madhyapradesh

Bhairav Diwase
0

विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड करणाऱ्यांवर ना. 

 मुनगंटीवार यांचा घणाघात
नऊ वर्षांत भारताने केलेल्या लक्षणीय प्रगतीचा मांडला आलेख

नीमच (मध्य प्रदेश):- देशातील जनतेने विश्वगौरव पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना २६ मे २०१४ रोजी आशीर्वाद दिला, तेव्हापासून त्यांनी देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने देशसेवा सुरू असून त्यांच्यावर खोटे आरोप करुन आगपाखड करणाऱ्यांची देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणतीही कृती नाही केवळ पंतप्रधानपदाची स्वप्न बघितली जाताहेत असा घणाघात करुन याचा देशातील जनतेने गांभीर्याने विचार करायला हवा
असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मध्य प्रदेशातील निमच येथे मोदी@9 या अभियानांतर्गत आज (ता. १६) आयोजित पत्रकार परिषदेत ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश, खासदार सुधीर गुप्ता, मध्य प्रदेश चे अर्थमंत्री जगदीश देवडा,जिल्ह्यातील सर्व आमदार आणि स्थानिक भाजप नेते उपस्थित होते.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये मोठा मूलभूत फरक आहे. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी परिवाराच्या कल्याणासाठी देशाचा विचार केला नाही तर भाजपच्या एका नेत्याने (नरेंद्र मोदी) देश पुढे नेण्यासाठी परिवार समर्पित केला.
दोन पक्षांमधील फरक अधिक स्पष्ट करताना ना. श्री. मुनगंटीवारांनी ‘राम आणि शाम’ची गोष्टही सांगितली. कॉंग्रेस ने कायम इतरांना लुटण्याचे काम केले असा आरोप त्यांनी केला.

कॉंग्रेसच्या लोकांनी गांधीजींचेही ऐकले नाही..

ना मुनगंटीवार म्हणाले की, इतर राजकीय पक्षांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवणेही शक्य होत नाहीये. पण राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं बघत आहेत. त्यात काही वाईट नाही. स्वप्न नक्की बघावे. पण स्वप्नातही ते देशाबद्दल, देशाच्या विकासाबद्दल बोलत नाहीत. आपण सर्व महात्मा गांधींना मानतो. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामला ते १९३० ते १९३८ या कालावधीत राहिले. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणाले होते की, कॉंग्रेस विसर्जित करा. पण कॉंग्रेसच्या लोकांनी गांधीजींचेही ऐकले नाही. गांधीजींच्या गुजरातमधूनच नरेंद्र मोदी आले आहेत. गांधीजी आणि मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपण आता करू, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

एक्सपायरी डेट संपली....

कॉंग्रेसच्या  राजकारणाची एक्सपायरी डेट संपली आहे. त्याचे औषधही आता आपल्या कामाचे नाही. आता "सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास" या तत्वावर सर्वांनी काम करण्याचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जींनी काश्‍मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला होता. त्या काळात तेथे तिरंगा फडकावणे म्हणजे रक्ताची होळी खेळण्याचा प्रकार होता. मोदींनी कलम ३७० हटवल्यानंतर आता तेथे येवढी शांती आहे की, राहुल आणि प्रियंका जाऊन बर्फ खेळू शकतात अशी कोटीदेखील ना मुनगंटीवार यांनी केली.

विक्रमादित्यांनी उभारलेले प्रभू श्रीरामाचे मंदिर १५२८मध्ये मीर बाकीने तोडले होते. आम्ही राम मंदिर उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो, तेव्हा कॉंग्रेसचे लोक आमची टिंगल उडवत होते. कारण त्यांच्या मनात प्रभू श्रीरामांबद्दल आस्था नव्हती. राम आणि रामायणाला ते काल्पनिक कथा समजत होते. आम्ही बोलल्याप्रमाणे राम मंदिर उभारण्याचे काम करून दाखवले, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)