रस्ता रुंदीकरणामुळे जाण्या-येण्याचा मार्ग झाला बंद #chandrapur

Bhairav Diwase

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमुर:- चिमुर येथील पिसे पेट्रोल पंप ते संताजी नगर पर्यंत रस्ता रूंदिकरणाचे काम सुरू आहे.रस्ता रूंदिकरण करित असतांना नाल्याचे बांधकाम सुद्धा सूरू आहे.नाल्याचे बांधकाम करित असतांना लोकांचा घराकडे जाणे व येण्याचा मार्ग फोडण्यात आला पण सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचे स्लोप न दिल्याने हरिश्चंद्र कामडी यांना गाडी ने- आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता झाला व नाली झाली पण सिमेंटचा स्लोप न झाल्याने जायचं कसं?हाच प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग संताजी नगर वासियांच्या जिवावर तर उठले नाही ना?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्लोप न दिल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.या भागात सर्वांचे स्लोप काढुन देण्यात आले पण हरिश्चंद्र कामडी या संताजी नगर वासियांचा स्लोप का काढुण देण्यात आला नाही? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.