रस्ता बंद झाल्याने अन्यायग्रस्त शेतकरी सहपरिवार करणार आमरण उपोषण #chandrapur #pombhurna


गोलाकार गेट ठरतोय शेतकऱ्याला विघ्न; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष?
पोंभूर्णा:- पोंभुर्णा शहरातील प्रभाग क्रमांक १, विकास नगर येथील तीन रस्त्यावर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली भव्यदिव्य गोलाकार गेटच्या बांधकामामुळे येथील एका शेतकऱ्याला स्वताच्या घरी जाण्याचा मार्गच बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होता.अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने प्रशासनाचे उंबरठे झिझवून सुद्धा न्याय मिळाला नाही.म्हणून अन्यायग्रस्त शेतकऱ्याने दि.१९ जून पासून सपरिवार संविधान चौकातील रस्त्याच्या मधोमध आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार यांना दिला आहे.रास्त असलेली अन्यायग्रस्त शेतकऱ्याची मागणी प्रशासन कसे सोडविणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोंभूर्णा शहरातील विकास नगर येथून चंद्रपूर,मुल,व आक्सापूर कडे जाणारा मुख्य रस्ता आहे.बांधकाम विभागाने विकास नगर येथील तीन रस्त्यावर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गोलाकार गेट बांधण्याचे काम सुरू केले. या गेटमुळे ५० वर्षांपासून वहिवाट असलेल्या लक्ष्मण तुकाराम मोगरकार यांच्या वडीलोपार्जीत घराचा ये-जा करण्याचा रस्ता गेटमुळे बंद झाला आहे. अन्यायग्रस्त शेतकरी लक्ष्मण मोगरकार यांनी बांधकामाला विरोध केला होता मात्र बांधकाम विभागाने अन्यायग्रस्त शेतकऱ्याला रोड काढून देण्याचे आश्वासन देऊन चुकीच्या पद्धतीने मार्गच बंद करून टाकले आहे.शेतीचा हंगामात त्यालख बंडी नेणे,खत नेणे,धान्याची बीजाई नेणे मोठे अवघड झाले आहे. ये-जा करण्याकरीता दुसरा पर्यायी मार्ग नसल्यामुळे त्याने प्रशासनाकडे विनंती केली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नगरपंचायत, तहसिलदार, जिल्हाधिकारी यांना रोड काढून देण्याची विनंती केली मात्र सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्याने पत्रकार परिषद घेऊन आपबिती सांगितली तरीही प्रशासन जागा झाला नाही.त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी लक्ष्मण मोगरकार यांनी शेवटी स्वतः व परिवारासोबत रस्त्याच्या मधोमध दि.१९ जून सोमवारला आमरण उपोषणाचा प्रशासनाला इशारा दिला आहे.

मागील पन्नास वर्षांपासून माझे येथे वास्तव्य आहे.मात्र गेट बांधण्याच्या नावाखाली आमचा रस्ता बंद करण्यात आला आहे.मी गरीब शेतकरी असल्याने प्रशासनाने माझी थट्टा केली आहे.रस्ता काढून देण्या संबंधाने न्याय मिळाला नाही तर मी व माझे कुटुंबासोबत आमरण उपोषण करीन.
लक्ष्मण मोगरकार, अन्यायग्रस्त शेतकरी पोंभूर्णा
प्रशासनाकडे रस्ता काढून देण्याची विनंती करून सुद्धा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.आज या परिवाराचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.प्रशासनाने खबरदारी घेत तात्काळ रस्ता काढून द्यावा.अन्यथा या उपोषणाला आमचाही पाठिंबा असेल.
बालाजी मेश्राम,नगरसेवक पोंभूर्णा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत