Top News

दहावीच्या फेरपरीक्षेसाठी आजपासून अर्ज करता येणार #chandrapur #pune

पुणे:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 7 ते 16 जूनदरम्यान ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय, आटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल. परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या वेबसाईटवर भरता येतील. 17 ते 21 जून या कालावधीत विलंब शुल्क भरून अर्ज करता येतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

परीक्षेला पहिल्यांदाच प्रविष्ट झालेल्या व श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2023 व मार्च 2024 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील. नियमित, विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावेत. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निधारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात आणि आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने