चंद्रपूर:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ चंद्रपूर मुख्यालयातील १० उपकेंद्रावर ४ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कलम १४४ नुसार परीक्षा उपकेंद्र व लगतचा १०० मीटर परिसर सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधित केला आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी व्यतिरिक्त २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. परीक्षेदरम्यान १०० मीटर क्षेत्रांतर्गत झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर सवलतींना प्रतिबंध राहणार आहे.
विद्या विहार हायस्कूल चंद्रपूर, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, सेंट मायकेल इंग्लिश स्कूल नगिनाबाग, सरदार पटेल महाविद्यालय, बीजेएम कॉरमेल अकॅडमी, रफी अहमद इंग्लिश हायस्कूल, मातोश्री विद्यालय तुकूम, श्री. साई तंत्रनिकेतन कॉलेज नागपूर रोड चंद्रपूर, न्यू इंग्लिश हायस्कूल, चांदा पब्लिक स्कूल या परीक्षा उपकेंद्रांना आदेश लागू राहणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत