प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल जाहीर, कुठे पाहता येणार निकाल? #Chandrapur #SSCexam #SCCresult

पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दि.‌ ०२ जून २०२३ ला १ वाजता निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

10वी चा निकाल कसा पाहाल?

अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर लॉग इन करा.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.

सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.

लॉगिन करा आणि तुमचा 10वीचा निकाल तपासा


अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.




माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१०वी) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने