Top News

कष्टाने आणि प्रेमाने बनवलेल्या सूर्यकिरण बंगल्यात राहण्याचं बाळूभाऊचं स्वप्नचं राहील #chandrapur


चंद्रपूर:- लोकसभा लढविण्याची तयारी बाळू धानोरकरांनी केली. त्यावेळी चंद्रपूरातील बंगल्याचे काम सुरु होते. त्यांनी बंगल्याला भेट दिली. कामाची पाहणी केली. कार्यकर्त्यांना म्हटलं, आपल्याला इथंच ऑफिस उघडायचं आहे. मी लोकसभेचे तिकीट घेऊन येतो. काँग्रेसच्या तिकिटावर ते खासदार झाले. आज भव्य असा बंगला उभा आहे. ऑफिस आहे. मात्र या बंगल्याचे प्राण असलेले धानोरकर या जगात नाही.

खासदार बाळू धानोरकर यांनी कष्टाने आणि प्रेमाने चंद्रपूरात बंगला बांधला. सूर्यकिरण असं या बंगल्याचे नाव. मृत्यूचा काही दिवसापूर्वीच बंगल्याचे वास्तुपूजन झाले होते. या बंगल्यात धानोरकर यांनी केवळ एक रात्र घालविली होती, अशी माहिती निकटवर्तीयांनी सांगितली. या बंगल्यात वास्तव्य करण्याचे धानोरकर यांचे स्वप्न अधुरं राहिलं. धानोरकर शिवसेनेचे आमदार झाले. आमदार असतानाच बंगल्याच्या कामाला सुरवात झाली होती. बंगल्याला लागुणचं ऑफिस आहे. धानोरकर जेव्हा दिल्लीला असायचे तेव्हा त्यांचे पीए गोविल मेहरकुळे यांना आज बंगल्याचे कुठलं काम झालं, याची माहिती मागवीत होते. आणि फोटो पाठवायला सांगत होते. या बंगल्यावर धानोरकरांचा जीव होता. परंतु कष्टाने आणि प्रेमाने बनवलेल्या सूर्यकिरण बंगल्यात राहण्याचं बाळूभाऊचं स्वप्नचं राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने