डॉक्टरांच्या सहभागातून जनतेसाठी आरोग्याचे सेवा प्रकल्प उभारणार:- डॉ. शरद अग्रवाल #chandrapur #warora


राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांची इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर ला भेट

चंद्रपूर:- इंडियन मेडिकल असोसीएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद अग्रवाल यांनी आपल्या चमूसह चंद्रपूर शहराला भेट दिली.त्यांच्या चमू मध्ये आयएमए चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जयेश लेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे,अध्यक्ष अकशन कमिटी डॉ.अनिल पाचनेकर, डॉ.संतोष कदम सचिव आयएमए महाराष्ट्र यांचा समावेश होता.

वरोरा येथील आनंदवन येथे "आओ गाव चले" या प्रकल्पाचे उद्घाटन केल्यावर उपस्थितांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसणी या गावाला भेट दिली.तेथे आयएमए चंद्रपूर तर्फे आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. गावातील १७३ रुग्णांनी ह्या शिबिरात सहभाग घेतला.

सदर आरोग्य शिबिरामध्ये WCLच्या राजीवरतन हॉस्पिटल व पी .एच .सी .घुग्गुस येथील डॉक्टरांनी देखील सेवा दिली. तसेच आयएमए च्या डॉ. मनीषा घाटे, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. सोनाली कपूर, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. अभय राठोड,डॉ. आशिष पोडे, डॉ.पल्लवी इंगळे, डॉ.अपर्णा देवईकर, डॉ. माधुरी मानवटकर, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ.रुचा पोडे , डॉ.ऋतुजा मुंधडा, डॉ.किर्ती साने या डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.
आनंदवन वरोरा येथील आरोग्य शिबिरामध्ये सावंगी मेघे हॉस्पिटल येथून आलेल्या डॉ. शृंखल ढेंगळे, डॉ.सृष्टी मंत्री, डॉ. ऋषिकेश गावंडे या डॉक्टरांच्या टीम ने योगदान दिले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्यावर सदर चमूने आयएमए हॉल गंजवार्ड चंद्रपूर येथे चंद्रपूर आयएमए तर्फे आयोजित केलेल्या आमसभेस भेट दिली. या कार्यक्रमात त्यांनी चिमूर आयएमए ह्या नवीन शाखेचे विधिवत उदघाटन केले,तसेच सभासदांसोबत हॉस्पिटल चालवितांना येणाऱ्या विविध अडचणी आणि अपेक्षित उपायांवर चर्चा केली.

ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन आयएमए चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. कीर्ती साने, सचिव डॉ.कल्पना गुलवाडे, कोषाध्यक्ष डॉ.अपर्णा देवईकर व त्यांच्या चमूने मुख्य संयोजक डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत