येरे घना येरे घना, शेतकरी झाला केविलवाणा chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शेतकरी शेतीच्या मशागतीला या दरम्यान मोठ्या प्रमाणात लागत असतात. वर्षभराची भाकर कशी मिळेल याबाबत शेतकरी खूप गंभीर असतो. एरवी मृग चांगलाच बरसायचा. आता मात्र अख्खा मृग कोरडा जात असल्याने मशागतीच्या कामालाही विलंब होत आहे. गर्मीचा तर कहरच झाला आहे.

शेतशिवार सजले, मात्र बळीराजाच्या नजरा आकाशाकडे!


शेतकऱ्यांच्या पिकपाण्यावर बाजार फुलत असतो, शेतकरी पिकला तर व्यापार धंद्याचीही बऱ्यापैकी चांदी असते. यंदा दुष्काळजन्य परिस्थिती ओढवण्याच्या संकेतामुळे शेतकरीवर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे.‌ आतापर्यंत पेरण्यापर्यंतची कामं आटोपली असती मात्र हा तपा तपत असल्याने अजूनतरी शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात कामाला लागलेला दिसत नाही.
पावासाची सुरवात न झाल्याने कामे पूर्णतः थांबलेली असून "येरे घना येरे घना" अशी केविलवाणी आळवणी शेतकरी करत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी मार सहन करत आलेला बळीराजा आता सरकारी धोरणांवर अवलंबून असल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या हितावह उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.