सरकी टिबायला गेला अन् परतलाच नाही, शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- फार प्रतीक्षेनंतर चंद्रपूर जिल्हात पाऊस बरसला. पाऊस पडल्याने पेरणीला सुरवात झाली. लगबगिने पेरणी सुरु आहे. बळीराजा आनंदात असतानाच एका दुदैवी घटनेने जिल्हात शोककळा पसरली. जिल्ह्यातील येरूर येथील देवराव रामाजी असुटकर ( वय 55) हे शेतकरी शेतात सरकी टिबनी करायला गेले असता कपाशीच्या बियांना औषध लावताना त्यांना विषबाधा झाली. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना लगेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी पेरणी करायला लागले आहेत. अश्यातच येरूर गावातील शेतकरी देवराव रामाजी असुटकर हे देखील आपल्या शेतात कपाशी टोबानी करायला गेले. कपाशीच्या बियाणाला बीजप्रक्रिया करताना त्यांना विष बाधा झाली. शेतातील इतर मजुरांनी त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र फार उशीर झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पडोली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)