Top News

शहरात इंटरनेट बंद करण्याचे मोबाईल कंपन्यांना आदेश? #internet #kolhapur #chandrapur #gadchiroli


कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली.

दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला. या परिसरात जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः रस्त्यावर उतरून जमावाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने