अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू # Korpana

Bhairav Diwase
0

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यात दिनांक १० जूनला दुपारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. कोरपना तालुक्यातील वडगाव येथील महिलेच्या अंगावर झाड कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

YouTube video news पाहण्यासाठी क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
कोरपना तालुक्यातील वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35 वर्ष) या महिलेच्या अंगावर झाड कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. गुलाब जिवतोडे यांच्या शेतात सदर महिला सरकी टिबायला गेली होती.

कोरपना तालुक्यातील वडगाव शेतशिवारात सरकी टिबायला गेली असता अचानक जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महिला झाडाखाली थांबली. दरम्यान तिच्या अंगावर झाड कोसळल्याने वैशाली झाडाखाली दबली गेल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती कोरपना पोलिसांना देण्यात आली असता कोरपना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून झाड हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मृतक महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविन्यात आला असून पुढील तपास कोरपना पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)