चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मागविल्या तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन #chandrapurloksabha #chandrapur #loksabha #loksabhaelection #EVM

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- आगामी काळात लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही अर्लट झाले आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाने तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन मागवल्या आहेत. (EVM machines from Telangana state ordered for Chandrapur Lok Sabha by-election)

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाची संभाव्य पोटनिवडणूक लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतीज्ञापत्र नामनिर्देशन पत्राचे 'अ' आणि 'ब' फॉर्म, विजयी उमेदवारांना देणारे प्रमाणपत्र, आई, सुधारित गुलाबी आणि सुधारित हिरवा पेपर सील तयार केला आहे. निवडणुकीचे वेळापत्रक लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी लगतच्या तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातून 800 ईव्हीएम मशीन मागवल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)