भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे राजुरा विधानसभा प्रमुख #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरु पक्षश्रेष्ठींनी सुरु केली आहे. त्यासाठी राज्यातील ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी केली आहे. चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना भाजपच्यावतीने राजुरा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (BJP District President Devrao Bhongle Rajura Assembly Chief)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांच्या यादीत देवराव भोंगळे यांचे नाव आहे. राजुरा विधानसभेची जबाबदारी भाजपने भोंगळेच्या खांद्यावर दिली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा (13) प्रमोद कडू
राजुरा(70) - देवराव भोंगळे
चंद्रपूर (71) - रामदास अंबाटकर
बल्लारपूर(72) - चंदनसिंग चंदेल
ब्रम्हपुरी (73)-अतुल देशकर
चिमूर(74)-गणेश तळवेकर
वरोरा(75)-रमेश राजूरकर यांची निवड करण्यात आली आहे. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)