तरुणांनो सावधान! सोशल मीडियावर आता चंद्रपूर पोलीसांनी करडी नजर #chandrapur #chandrapupolice


जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणारे पोस्ट केल्यास होणार कायदेशीर कारवाई

चंद्रपूर:- सोशल मीडियातून किंवा एखाद्या ठिकाणाहून धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य अथवा पोस्ट व्हायरल केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार येणार आहे.‌ त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना विशेषतः तरुणांना अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.


सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे चित्र संबंध महाराष्ट्रात आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असून सायबर पोलिसांकडूनही संशयास्पद व्यक्तींच्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवरील खात्यांवर वॉच ठेवला जात आहे.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा व त्याला सातत्याने सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, सर्वकाही सुरळीत सुरु असताना असा प्रकार होणे पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणारा नाही. प्रत्येकांनी स्वत:च्या कुटुंबाचा व भविष्याचा विचार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

.....तर थेट कायदेशीर कारवाई होईल

शहानिशा न करता सोशल मीडियातून मेसेज, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तरूणांनी अफवा, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशा गोष्टी फॉरवर्ड करू नयेत. ज्यामुळे स्वत:चे आयुष्य बरबाद होईल. अशाप्रकारच्या कृत्यांवर चंद्रपूर पोलीसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल.


https://youtube.com/@Adharnewsnetwork?feature=share7


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत